– बोदाड (राजूर )येथील संशायित आरोपी मारेगावात गजाआड
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
सोळा वर्षीय मुलगी नातेवाईकांकडे जात असतांना दुचाकीने आलेल्या मुलाने सोडून देण्याच्या बहाण्याने थेट राज्य महामार्गाच्या कडेला असलेल्या झूडपात नेत कुकर्म केले. यात पिडीतीच्या पोटात अंकुराची वाढ होत असल्याने थेट पोलिसात तक्रार दाखल केली. संशायित आरोपीस अत्याचार, अँट्रॅसिटी अँक्ट व पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, मागील डिसेंबर महिन्यामध्ये पिडीत अल्पवयीन मुलीचे आईवडील बाहेरगावी गेले होते. पिडीता एकटीच घरी थांबण्यापेक्षा गावातच असलेल्या नातेवाईकाकडे निघाली. वाटेत मोटारसायकलने संशायित आरोपी वैभव राजूरकर (22) याने नातेवाईकांकडे सोडून देण्याची आग्रही भूमिका वटवित राज्यमहार्गावर एका बिअर बार मागे असलेल्या झूडपात नेले. येथे बळजबरीने शारीरिक सबंध प्रस्थापित करून याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अशातच पिडीता हीच्या पोटात दिवसागणिक अंकुराची वाढ होत असल्याची फिर्याद मारेगाव पोलिसात दाखल करण्यात आली.
त्यानुसार संशायित आरोपीस कलम 64(1), 3(1) 4, 3(1) 3(2) नुसार गुन्हे दाखल करून गजाआड करण्यात आले.