आत्महत्येची धग… मारेगाव येथील उच्चशिक्षित युवतीने घेतला गळफास

 

– इंजिनियर असलेल्या ‘दिक्षा’ च्या आत्महत्येने हळहळ 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

येथील प्रभाग क्रमांक 16 मधील अभियांत्रिकी पदावर असलेल्या उच्चशिक्षित युवतीने स्वगृही गळफास घेत जीवनाचा अखेर केल्याची दुर्देवी घटना आज दि. 8 मे रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 

दिक्षा केशव उमरे (27) रा. मारेगाव असे गळफास घेवून जीवनयात्रा संपविलेल्या तरुणीचे नाव आहे.

 

उमरे कुटुंबियांची थोरली मुलगी असलेली दिक्षा ही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून औरंगाबाद येथील कंपनीत जॉब करीत होती. या दरम्यान यंदा चतुर्भुज होण्याच्या नियोजनात लग्न ही जुळले होते. मात्र हे लग्न काही कारणास्तव मोडले. हा पश्चाताप मनात असह्य वेदना करीत असतांना दिक्षाने टोकाचे पाऊल उचलत स्वगृही बेडरूम मध्ये पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत इहलोकाची यात्रा केली.यावेळी आई वडील व दिक्षा हे घरातील हॉल मध्ये झोपले असतांना पहाटेच्या सुमारास दिक्षाने संधी साधत अस्वस्थ मनाला कायमची वाट मोकळी केली.

 

सकाळी आईवडील उठल्यागत बेडरूमचा दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडला असता दिक्षा मृतदेह लटकलेला दिसल्याने शहरात पुरती खळबळ व हळहळ व्यक्त होत आहे.

 

परिणामी, दिक्षाच्या पश्चात आई, सेवानिवृत्त वडील व धाकटी बहीण आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment