भयाण वास्तव… मार्डी मारेगाव रस्ता मस्त.. मरण झाले स्वस्त….!

 

वाहनधारकांचे जीव गेले , कंबरडेही मोडले 

– प्रशासन सुस्त : काँग्रेसचे जनआंदोलन

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

मारेगाव मार्डी रस्ता नरकयातनेचे माहेरघर बनले आहे. अख्खा रस्ता उखडून मोट्ठे खड्डे पडून आजतागायत अर्धा डझन पेक्षा जास्त लोकांचे बळी गेलेत, अनेकांचे कंबरडे मोडले मात्र प्रशासनास सोयीरसुतक नसल्याने आता मारेगाव तालुका काँग्रेस पक्ष रस्ता दुरुस्तीसाठी जनआंदोलन उभारण्याच्या तयारीला लागल्याची माहिती तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी ‘विटा’ शी बोलतांना दिली.

 

मारेगाव मार्डी हा दहा किमी. चा अंतराचा रस्त्याची चाळण होवून मागील अनेक वर्षांपासून खस्ता खाऊन आहे. पूर्णतः उखाडलेल्या रस्त्याला मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहनधारकाची कसरत सुरु आहे. या रस्ताने अपघाताची मालिका ही नशिबाला चिकटलेली असतांना अनेकांचे बळी व कंबरडे मोडणे नित्याचेच बनले आहे. त्यामुळे या रस्त्याने पायदळ चालनेही दुरापास्त झाले आहे. रस्त्याच्या चाळणीमुळे प्रशासनाबाबत प्रचंड रोष व्यक्त होत असतांना आता उग्र आंदोलनाची तयारी सुरु झाली आहे.

 

मारेगाव पासून दोन किमी अंतरासाठी निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आहे मात्र काम सुरु करण्यास अजूनही मुहूर्त सापडत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी, अपघात व जीव जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने जनतेत प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

 

“प्रशासन केवळ लोकांचे बळी जाण्याचे वाट पाहत आहे. हा रस्ता काही किमी मंजूर आहे मात्र काम सुरु करण्यात प्रशासनाचा बेतालपणा कारणीभूत ठरत या रस्त्याने बळी जात आहे.हे असह्य होत असल्याने लवकरच आपण जनआंदोलन उभारू असा गर्भीत ईशारा काँग्रेस तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी दिला”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment