मारेगाव शाळेचा डंका… महात्मा ज्योतिबा फुले शाळेचा द्वितीय क्रमांक

 

– मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान 

– शैक्षणिक क्षेत्रात अभिनंदनासह कौतुकाचा वर्षाव 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 अभियानात मारेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय अवघ्या जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावित मारेगावच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला.दरम्यान,शाळेचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या टप्पा दोन उपक्रमात तालुक्यातील बहुतांश शाळा सहभागी झाल्या होत्या. यात महात्मा ज्योतिबा फुले शाळेने शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन अध्यापनात शैक्षणिक साधनाचा वापर, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, पर्यावरण संवर्धन, कला क्रीडा व वैज्ञानिक दृष्टिकोन , गुणांचा विकास, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य सह सर्वांगीण निकषाची पूर्तता करीत सदरील शाळेने यश संपादित केले.

मारेगाव तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून असलेली ओळख त्यातच शैक्षणिक क्षेत्रातील सुंदर शाळा म्हणून महात्मा फुले शाळेने पटकाविलेले यश शाळेच्या गुणवत्तेत भर टाकत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अधोरेखित केला आहे.

शाळेला मिळालेल्या अगणित यशात संस्थाध्यक्ष अरविंद बोबडे, सचिव विप्लव ताकसांडे, उपाध्यक्ष प्रेमानंद भेले, मुख्याध्यापक हेमंत ताजने, सहाय्यक शिक्षिका वनिता दुर्गे, अश्विता परचाके, सहाय्यक शिक्षक प्रफुल्ल ठाकरे, लिपीक रोहित काळे आदींचा पुढाकार लाभला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment