मारेगावात बाबासाहेबांना नतमस्तकांसाठी रिघ

 

– बँजो, डीजेच्या तालावर अनुयायी थिरकले

– शहरातून बाईक रॅली व ऐतिहासिक मिरवणुकीतून अभिवादन 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांना वंदन करीत शेकडो जणांनी अभिवादन करीत कृतज्ञता व्यक्त केली.

 

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रुपाला सकाळपासून मानवी जत्थ्यांच्या थव्यांची रिघ लागत मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलीत करीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, समता सैनिक दल व शहरातील तमाम मान्यवर, उपासक, उपासिकेच्या उपस्थितीत वंदन करीत पोलीस निरीक्षक संजय सोळंखे यांचे हस्ते निळ्या ध्वजाचे धजारोहन करण्यात आले. यावेळी सामूहिक बुद्ध वंदनेने बाबासाहेबांना नमन करण्यात आले.

 

येथील धम्मराजीका बुद्ध विहारात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन उत्सव समितीचे अध्यक्ष हेमंत नरांजे, सचिव दीपक डोहणे,उपाध्यक्ष चांद बहादे यांचे हस्ते करण्यात आले. विहारातील बुद्ध रूपाच्या पूजननंतर सामूहिक बुद्धवंदना आणि तहसीलदार उत्तम निलावाड, मुख्याधिकारी बाबर, नगराध्यक्ष डॉ. मस्की यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत समता,बंधुत्व व न्यायाचे अनुकरण करण्यावर भर देत मानव निर्मित समाजघडवून बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाची भूमिका प्रतिपादित केली.

 

दुपारी पंचशील व निळे ध्वज दुचाकीवर लावत बाईक रॅली काढण्यात आली.सायंकाळी ऐतिहासिक मिरवणुकीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत शेकडो युवक युवती महिला व प्रौढाणी फटाक्यांच्या रंगीबेरंगी आतषबाजीचा धुराळा सह बँजो आणि डीजेच्या तालावर ठेका धरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा जल्लोष करीत बाबासाहेबांच्या रूपाजवळ अभिवादन रॅलीची बुद्धवंदनेने सांगता करण्यात आली.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साठी हेमंत नरांजे, दीपक डोहणे, चांद बहादे, ओमप्रकाश पाटील, विलास रायपुरे,गौरव चिकाटे,गजानन चंदनखेडे, गोलू कोवे, दुष्यन्त वानखेडे, वसुमित्र वनकर उपासिका समितीच्या सुरेखा भेले, वंदना रायपुरे, सुवर्णा नरांजे, मोनाली रायपुरे, शीतल तेलंग, आदींनी पुढाकार घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment