– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र प्रदान
– युवा नेतृत्वाच्या निवडीने काँग्रेस संघटना कणखर होण्याचा आशावाद
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या मारेगाव तालुका उपाध्यक्षपदी युवा नेतृत्वाला संधी देत बबलू उर्फ शकील अहेमद शरीफ अहेमद यांची एकमताने निवड करण्यात आली.
पक्षाला अधिकची बळकटी मिळावी या उदात्त हेतूने नवागत नेतृत्व समोर आले पाहिजे हे पक्षाचे धोरण अंगीकारत येथील बबलू उर्फ शकील अहेमद यांची मारेगाव तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
माजी आमदार वामनराव कासावार, ज्येष्ठ नेते नरेंद्र ठाकरे, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, दुष्यन्त जयस्वाल, तुळशीराम कुमरे, गजानन खापणे, नंदेश्वर आसूटकर , छायाताई किनाके आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
बबलू यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असतांना पक्षाला अधिकची बळकटी देण्याचा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.