– म्हैसदोडका येथे मान्यवरांची उपस्थिती
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
तालुक्यातील म्हैसदोडका येथील सरपंच सौ. ललिता मारोती तुरणकर यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय साहित्य वाटप करीत जन्मदिवस साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त अधिकचा उहापोह न करतात सामाजिक जाणीवेतून येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करीत आयुष्याला सकारात्मक आकार देण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी सरपंच ललिता तुरणकर यांना पुष्पगुच्छ देत भावी आयुष्याच्या शुभेच्छा प्रदान केल्या.
याप्रसंगी येथील मुख्याध्यापक लोंढे सर, ठाकरे सर, हेपट सर, कुमरे मॅडम, बोधाने मॅडम , मारोती तुरणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.