मारेगावात उत्सव स्त्रीत्वाचा..! ध्यास समानतेचा…!!

 

– जागतिक महिला दीन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

 

समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय मिळवून देणारे, सामाजिक क्रांती घडवून देशाची शान उंचावणाऱ्या महापुरुषांच्या शौर्याची माहिती बहुजनांना मिळावी ह्या उद्देशाने प्रेरित होऊन बहुजन उद्धारक, कायदेतज्ज्ञ, प्रज्ञासूर्य, भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव व जागतिक महिला दिन साजरा करत आहेत.

*विदर्भस्तरीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धा* (Traditional dress competition)

 

वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि देशांमध्ये विविध प्रकारचे पारंपरिक कपडे आहेत जे गेल्या हजारो वर्षांपासून स्थानिक लोक परिधान करतात. पारंपरिक वेशप्रणाली ही एक प्रकारची परंपरा आहे. आपली परंपरा जोपासली जावी या उद्दात हेतूने18वर्षांवरील महिलांसाठी’ पारंपरिक वेशभूषा’ स्पर्धे चे आयोजन केले आहे. प्रवेश फी 100र ₹

प्रथम बक्षीस 5000/-

व्दितीय बक्षीस 3000/-

तृतीय बक्षीस 2000/

विदर्भस्तरीय नृत्यस्पर्धा

12एप्रिल सायंकाळी 5वाजता 30 वर्षा वरील वयोगटाच्या महिला करीता नृत्यस्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे.

वसंत जिनिंगच्या पटांगण वर होणारी ही नृत्य सपर्धा समूह नृत्य व एकल नृत्य अश्या दोन प्रकारे घेण्यात येणार आहे.

समूह नृत्याला

प्रथम 11000/-

द्वितीय 9000/-

तृतीय 7000 रोख

एकल नृत्याला

प्रथम 7000 /-

द्वितीय 5000 /-

तृतिय 3000 /-रोख आणि चषक देण्यात येणार आहे .

प्रवेश फी समूह नृत्यासाठी 500 तर एकल नृत्यासाठी 250रूपये राहील.

भव्य सांस्कृतीक महिला रैली

दिनांक 13एप्रिल रविवारी सायंकाळी 4वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातुन रैली प्रारंभ होऊन शहरात मार्गक्रमण करीत परत येईल.

रॅली मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळ्याचे सत्याग्रहाचा दृश्य दाखविणारा देखावा सादर केला जाणार आहे.तसेच ढोल ताशा गजरात विविध नृत्य व आदिवासी डंडार नृत्य सादर केले ‌जाणार आहे

प्रवेशासाठी सौ .प्रतिभा डाखरे9922669648,सौ.बीना दुपारे हेपट9356035463 सौ.मयुरी जैस्वाल 7066006684 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मारेगावं मैत्री कट्टा ग्रुप च्या वतीने कार्यक्रमाचे संयोजक दीपक जूनेजा यांनी केले आहे.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सौ.बिना हेपट (दुपारे), सौ.प्रतिभा डाखरे ,उदयभाऊ रायपुरे, गणेश पावशरे ,किशोर पाटील ,गजानन जयस्वाल, शहाबुद्दीन अजानी आदी सदस्य अथक परिश्रम घेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment