प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून कॅन्सरने मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची आर्थिक मदत

 

मारेगाव : कैलास ठेंगणे

मारेगाव येथील भारतीय स्टेट बँक शाखेअंतर्गत कार्यरत स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र (मन कॉम्प्युटर) चे संचालक सचिन उमाकांत फरकाडे यांच्या मार्गदर्शनाने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत एका पीडित कुटुंबाला आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.

 

जानेवारी 2025 मध्ये मंदा आनंद ताकसांडे या महिलेला कॅन्सरने ग्रासले होते आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांनी पूर्वीच भारतीय स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्रामार्फत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत विमा घेतलेला होता. तिच्या मृत्यूनंतर 2 एप्रिल 2025 रोजी मुलगा, दीपक आनंद ताकसांडे याला 2,00,000 रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

 

या प्रसंगी भारतीय स्टेट बँक मारेगाव शाखेच्या व्यवस्थापक वैशाली रंगारी, कर्मचारी सिमा गोरखेडे तसेच ग्राहक सेवा केंद्राचे संचालक सचिन फरकाडे उपस्थित होते. श्रीमती रंगारी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही अल्प प्रीमियममध्ये मोठा विमा संरक्षण देणारी उपयुक्त योजना आहे. सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.”

 

हा निधी कुटुंबासाठी मोठा आधार ठरला असून या योजनेमुळे सामाजिक सुरक्षेची भावना अधिक दृढ झाली आहे. ग्राहक सेवा केंद्राचे सचिन फरकाडे यांनीही वेळेवर कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित लाभार्थ्याला सहाय्य केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक् केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment