– दोघे जखमी एक गंभीर
– गौराळा येथील घटना
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
दुचाकीने वणी कडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक देत ट्रक ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जन जखमी झाल्याची घटना राज्य महामार्गवरील गौराळा फाट्या नजीक आज शुक्रवारला सकाळी 10 वाजताचे दरम्यान घडली.
प्रथमेश भास्कर बोढाले (22)रा. हातगाव पिंपरी व मारेगाव पोलीस जमादार भालचंद्र मांडवकर असे जखमी झालेल्या दोन दुचाकीस्वारांचे नाव आहे.
प्रथमेश हा नातेवाईकाच्या लग्न प्रसंगी वणी कडे दुचाकीने प्रस्थान करीत असतांना त्याचे नियंत्रण सुटत समोरून येणाऱ्या पोलीस भालचंद्र मांडवकर यांच्या दुचाकीला धडक दिली.या समोर जात त्याची दुचाकी समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली यात प्रथमेश याच्या डोक्याला जबर इजा झाली तर दुसरी दुचाकी कोसळून मांडवकर यांचा हात फ्रॅक्चर झाला.
दोन्ही जखमींना मारेगाव रुग्णालयात प्राथमिक उपचारा नंतर प्रथमेश यास नागपूर तर मांडवकर यांना वणी येथे हलविण्यात आले.