– सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
– भारत सरकार तर्फे नियुक्ती
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव येथील प्रसिद्ध विधिज्ञ अँड. मेहमूद खान पठाण यांची भारत सरकारने नुकतीच नोटरीपदी नियुक्ती केली आहे.
मारेगाव तालुक्यातील बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळख निर्माण केलेले अँड. मेहमूद खान हे येथील ख्यातीप्राप्त तरुण वकील आहेत.
मारेगाव येथील उच्चशिक्षित असलेले अँड मेहमूद खान यांचे बी. कॉम, एल. एल. बी, जर्नालिझम अँड मॉस कम्युनिकेशन डिप्लोमा, सिव्हील इंजिनियर डिप्लोमा हे शिक्षण झाले आहे.
ते मारेगाव तालुका वकील संघांचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या नियुक्तीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. आता सर्वसामान्यांचे विधि विषयक अनेक कामे सुलभ होतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.