दुर्देवी घटना..वीज पडून शेतकरी गतप्राण

 

– बंदी वाढोणा येथील घटना 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

झरी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या बंदी वाढोणा येथील शेतात काम करतांना शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना आज गुरुवार ला सकाळी 9 वाजताचे दरम्यान घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

वसंतराव नरसिंग चव्हाण (40) असे वीज पडून ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मृतक शेतकरी हा शेतात काम करीत होता. गत दोन दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल होवून आज सकाळी बंदी वाढोणा परिसरात तुरळक पाऊस झाला. अशातच विजेचा कडकडाट होवून शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळली. यातच चव्हाण हे शेतकरी जागीच गतप्राण झाले. या दुर्देवी घटनेने बंदी वाढोणा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतक शेतकऱ्याच्या पश्चात आई वडील, पत्नी व दोन मुले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment