भिषण अपघात…  कार ने दुचाकीला नेले 400 मीटर फरफटत

 

– दोघे गंभीर जखमी 

– कार चालकाचा वाहणासह पोबारा 

बोटोणी : विटा न्युज नेटवर्क 

वणी वरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कार ने दुचाकीस्वारांना अक्षरशः 400 मिटर फरफटत नेत पोबारा केला. या अपघातात दोन युवक गंभीर झाल्याची घटना आज दि. 29 मार्च रोजी रात्री 7 वाजता राज्यमहामार्गा वरील घोगुलदरा फाट्यानजीक घडली.

 

अज्ञात चारचाकी वाहन हे वणी वरून भरधाव करंजी दिशेने जात होते. याच दिशेने मोटारसायकल वरून मारेगाव तालुक्यातील वाघदरा येथील सतीश झिगूं आत्राम (22) व निलेश तुकाराम दडांजे (35) हे जात असतांना राज्यमहामार्गांवर असलेल्या घोगुलदरा फाट्या पासून अज्ञात कार ने अक्षरशः दुचाकीला फरफटत तब्बल 400 मिटर वरील बोटोणी नजीक सराटी फाट्यापर्यंत नेले. हा थरार येथील अनेकांनी प्रत्यक्षात बघीतला. येथे गतिरोधक असल्याने दुचाकी कडेला पडली यात दुचाकीस्वार दोघेही गंभीररित्या जखमी झाले. मात्र हे अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले.

 

गंभीर जखमी दुचाकीस्वार सतीश व निलेश यांना करंजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment