सुने कडून 1 लाखाची मागणी , जेवणातही फिनाईल…  श्रीधर सिडाम सह सहा जनाविरोधात गुन्हे दाखल

 

कौटुंबिक अत्याचाराचे सातत्य : मारेगाव पोलिसात तक्रार 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

कौटुंबिक त्रासाच्या असह्य वेदनेचा परिपाक त्यातच माहेरून लाख रुपये आणण्याचा तगादा एवढेच नव्हेतर जेवणात फिनाईल द्रव्य मिसळवून जीव घेण्याचा प्रयत्न यामुळे कमालीची त्रागलेल्या सुनेने सासरच्या सहा जना विरोधात तक्रार दाखल केल्याने पती, सासू, सासरे व 3 नणंद विरोधात मारेगाव पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.

 

मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील संजना नामक मुलीशी मारेगाव येथील सतीश श्रीधर सिडाम याचेशी फेब्रुवारी 2022 रोजी आंतरजातीय विवाह झाला. सुरुवातीचे काही दिवस गोड्यागुलाबिने गेल्यानंतर सासर कडील सर्वांनीच जातीची ठिणगी टाकली.तू जातीची नसल्याने हुंडा मिळाला नाही त्यामुळे आता तुझ्या माहेरून एक लाख रु. आण असा तगादा, जन्माला आलेल्या मुलीबाबत साशंकता, चारित्र्यावर संशय, घरून निघून जाण्याच्या धमक्या व मारहाण, जेवणात फिनाईल द्रव्य टाकून फासावर लटकवित जीवे मारण्याचा प्रयत्न. एवढेच नव्हेतर तलवारीने मारून टाक मी पाहून घेतोय असा सासरा श्रीधर सिडाम कडून तोरा दाखविण्यात येत असल्याने संजना ही मानसिकदृष्ट्या पूर्णतः खचली होती.

 

परिणामी, हुंड्यासाठी सातत्याने छळ , सोशल मिडीयावरून धमकी आणि बदनामीकारक संदेश पाठवीत मानसिक, आर्थिक व शारीरिक छळ देत असल्याची मारेगाव पोलिसात फिर्यादी संजना हिच्या तक्रारवरून आरोपी पती सतीश श्रीधर सिडाम, सासरा श्रीधर शामराव सिडाम, सासू तारा श्रीधर सिडाम , नणंद पूजा श्रीधर सिडाम , मनीषा पांडुरंग मेश्राम, नम्रता सचिन आत्राम यांचे विरोधात विवाहसंबंधी अपराध, धाकदपट धमकी, सामूहिकरित्या कट रचण्याचा प्रयत्न करण्याचे कलम 85, 352, 351(2), 351 (3), 3 (5) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment