– मूळ पावती नसल्याने अडथळे
– लाभार्थ्यांची डोकेदुखी वाढली
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या मारेगाव नगरपंचायत प्रशासनात कर भरलेली पावती कार्बन कॉपी स्वरूपात मिळत असल्याने न्यायालयीन व इतरत्र कामकाजात अडथळा निर्माण होवून लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने यात सुधारणा करून मूळ पावती प्रदान करावी अन्यथा आंदोलन उभारण्याचा ईशारा येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन चंदनखेडे यांनी निवेदणाद्वारे दिली आहे.
येथील नगरपंचायत प्रशासनाने अजब गजब फतवा काढला असून याचा फटका लाभार्थ्यांना बसत आहे.कर भरणा केल्यानंतर मूळ (ओरिजनल ) पावतीला बगल देत कॉर्बन कॉपी लाभार्थ्यांच्या मस्तकी मारत आहे.हा बोळवणाचा प्रकार मागील पंधरा वर्षांपासून सुरु असल्याची माहिती आहे.दरम्यान, इतर कामकाजात कमालीची अडचण निर्माण होत असल्याने प्रशासनाप्रती संताप व्यक्त होत कनिष्ठ लिपिक यांचा खाबुगिरीचा बोलबाला उजेडात आला आहे.
दरम्यान, यात मुख्याधिकारी सह स्थानिक लोकप्रतिनिधी असलेले नगरसेवक यांचीही भूमिका कुचकामी ठरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत लाभार्थ्यांची गळचेपी होत प्रशासनाचे लक्तरे वेशीवर टांगल्या जात आहे. यात तात्काळ सुधारणा करून कराची मूळ प्रत लाभार्थ्यांना प्रदान करावी अन्यथा नगरपंचायत कार्यालय समोर आंदोलन छेडू असा गर्भीत ईशारा सामाजिक कार्यकर्ते गजानन चंदनखेडे यांनी प्रशासनास दिलेल्या निवेदनातून दिला आहे.