सेवाकार्याचा आयाम… मारेगावात पाणपोईचे उदघाटन

 

– स्व. मारोती व स्व. सुंदराबाई स्मृती प्रित्यर्थ दयाल रोगे यांचा पुढाकार 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

येथील पोलीस स्टेशन लगत असलेल्या पेट्रोलपंप नजीक पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून पाणपोई उभारण्यात आली आहे.

मारेगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दयाल रोगे यांच्या पुढाकाराने व आईवडील स्मृतिशेष मारोती पा. रोगे व सुंदराबाई रोगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा मानवी दिलासादायक उपक्रम राबविण्यात आला.

पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या विशेष मार्गदर्शनात उपनिरीक्षक जाधव यांनी या पाणपोईचे उदघाटन केले.

या सामाजिक संवेदनशील उपक्रमाने वाटसरू, फेरीवाले यांना सूर्य आग ओकणाऱ्या उन्हामध्ये थंड पाण्याची सोय झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment