Breaking News

बैलाच्या गोठ्यात चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न

 

– मारेगाव तालुक्यातील घटना 

– विधिसंघर्ष बालकास अटक 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

गावात खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुकलीस पशुधनाच्या गोठ्यात नेवून अत्याचाराचा प्रयत्न केल्याची खळबजनक घटना रविवार दि. 2 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजताचे दरम्यान मारेगाव तालुक्यात घडली. याप्रकरणी 15 वर्षीय विधी संघर्ष बालकास अटक करण्यात आली.

 

मारेगाव तालुक्याच्या पूर्वेस असलेल्या एका गावात पीडिताचे आईवडील कामावर गेले होते.आजी सोबत ती घरी असतांना ही पिडीत चिमुकली बाहेर खेळत होती. काही वेळात आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका पंधरा वर्षीय बालकाने पशुधनाच्या गोठ्यात नेवून तेथे अत्याचाराचा प्रयत्न केला.

 

या दरम्यान, पिडीत चिमुकलीचे वडील गावात येताच बालिकेचा शोध घेतला असता संशायित गोठ्यातून निघाला व पिडीता गोठ्यात आढळली. बालिकेस विश्वासात घेत आईने विचारपूस केल्यानंतर हा गंभीर प्रकार उजागर झाला. लागलीच मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर संशायित विधी संघर्ष बालकास बाल लैंगिक संरक्षण अधिनियम कलम 65(2), 64(2), 3(ब ) 4, 5 (म ), 6 नुसार गुन्हे दाखल करून अटक केली.

 

या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास वणी – मारेगाव पोलीस करीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment