देशी वाली आधीच भानगड…पण केली मुंबईत गडबड..!

 

– दारू दुकान विरुद्ध आंदोलन भडकणार

– आज उपोषण चा तिसरा दिवस

 

दीपक डोहणे : मारेगाव

 

येथील बहुचर्चित अन् तितकीच वादग्रस्त देशी दारूच्या दुकान विरुद्ध आता आंदोलन भडकणार आहे. ही दुकान अनेक वर्षापासून वादग्रस्त राहिली आहे. प्रथम मौजा खैरी येथे ही दुकान सुरू करण्यासाठी खूप आटापिटा केला गेला होता. पण तेथील गावकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दुकान धारकला बराच घाम फोडला होता. त्यात पुन्हा आटापिटा करून हे दुकान सुरू करण्यात आले. आता या दुकान स्थलांतर मुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.

 

सौ. परिनीता परमानंद जयस्वाल हीची देशी दारू दुकान सुरवात पासून बरीच भानगडीत राहिली. राळेगाव तालुक्यातील खैरी या गावात सुमारे सतरा वर्षा पूर्वी हे दुकान थाटण्याचा प्रयत्न झाला. दुकान च्या कागदपत्रात खूप भानगडी होत्या. हे समजताच तेथील गावकरी भडकले. जयस्वाल कडून लोकांना मॅनेज करण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला. साम, दाम, दंड, भेद या सर्व कुटील डावचे खूप प्रयत्न करण्यात आले. मात्र गावकरी जाम भडकले. तुमच्या भिकेचा तुकडा आम्हाला नको, आमच्या गावात आम्हाला हे दारू दुकान नकोच..!असा आक्रमक पवित्रा घेत तेथील लोकांनी थेट उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ येथे याचिका दाखल केली. सर्व गोलमाल समोर आले. आणि गावात दारू दुकान चालू करण्याचा प्रयत्न उच्च न्यायालयातर्फे हाणून पडला.

 

डोकं खाजवत मग पुन्हा शक्कल लढवली. मारेगावात शांत लोकं आहे, तिथे सर्व खपून जाईल असे गृहीत धरून शहरात एका ठिकाणी पुन्हा दुकान सुरू करण्यासाठी धावपळ झाली.

 

आता परवाना धारक यांनी कुणाच्या धार्मिक, सामाजिक भावना यांना फाट्यावर ठेऊन चक्क शांती चे प्रतीक असलेल्या बुद्ध विहार जवळच ही वादग्रस्त देशी दारू दुकान थाटली आहे.

या विरोधात महिलाच आता रस्त्यावर उतरल्या आहेत. दारू दुकान हटल्याशिवाय उपोषण हटणार नाही असा पवित्रा घेतला आहे. महिलांच्या उपोषण चा आजचा तिसरा दिवस असून नेमके हे आंदोलन काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment