– अनेकजन पडले मध्यरात्री घराबाहेर
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
तालुक्यातील काही भागांमध्ये काल रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.त्यामुळे अनेकात भितीचे सावट आहे.
सोशल मीडिया आणि नागरिकांमध्येच याविषयी चर्चा सुरू झाली आहे. परंतु तालुका प्रशासनाने मात्र अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तालुका प्रशासन जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क करीत आहे.
तालुक्यांतील कुंभा, पिसगाव येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. धक्के सौम्य स्वरूपाचे असल्यामुळे असल्यामुळे काहींना हलल्या सारखे झाले.निवांतपणे घरी झोपण्याचा तयारीत असलेले नागरिक घरा बाहेर पडले.सम्पूर्ण घर हलल्या मुळे नागरिकांना मध्ये भीती निर्माण झाली आहे.
याबाबत आता सोशल मीडिया वर भूकंपाच्या या सौम्य धक्का विषयी चर्चा सुरू झाल्यानंतर ठीक ठिकाणी अशा स्वरूपाचे धक्के जाणविल्याची चर्चा सुरू झाली आहे. या विषयी तालुका प्रशासनाने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.त्यामुळे ठिकठिकाणी नागरिकांना रात्री घरा बाहेर पडले. रात्रीच्या सुमारास अनुभवायाला मिळालेले सौम्य स्वरूपाचे धक्के भूकंपाचे असल्याचे बोलले जात आहे.धक्के काही सेकांदाचे असल्याचे सांगितले जात आहे.