आत्महत्येची धग…आजाराला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

 

– विहिरीत आढळला मृतदेह : बुरांडा (ख.) येथील घटना 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

तालुक्यातील बुरांडा येथील विवाहित महिलेने मध्यरात्री विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना आज 13 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली.

 

मंदाताई आनंद ताकसांडे (40) असे आजाराने कंटाळून आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

 

मृतक महिला ही गत काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होती. आजाराने पुरती ग्रासली असतांना तिने मध्यरात्री विहिरीत उडी घेतली. सकाळी नातेवाईकांनी इतरत्र शोध घेतला असता गावातीलच एका विहिरीत मृतदेह आढळून आला. मृतक महिलेच्या पश्चात मुलगा व मुलगी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment