– केगाव येथील घटना
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
शिरावर असलेल्या कर्जाने व्यथित होत मारेगाव तालुक्यातील केगाव येथील युवा अल्पभूधारक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात विष प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना आज मंगळवारला सकाळी 9 वाजता उघडकीस आली.
पवन आण्याजी पिंपळशेडे (35) असे विष घेवून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पवन हे आपल्या तीन एकर जमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.निसर्गाचा बेतालपणा व उत्पादना वरील तोडक्या भावाने शिरावर कर्ज वाढले.मारेगाव येथील एका राष्ट्रीयकृत बँकेचे तब्बल 4 लाख रु. कर्ज आणि खाजगी कर्जाने त्याला काही दिवसापासून विवंचना अस्वस्थ करीत असतांना आज सकाळी स्वतःचे शेतात मोनोसील नामक कीटकनाशक द्रव्य प्राशन करून इहलोकाची यात्रा केली. दरम्यान, त्याचा मृतदेहच आढळून आल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतक पवन यांच्या पश्चात आई, पत्नी कांचन व 5 वर्षाचा दिवांशू नामक बालक आहे.