आत्महत्येची धग… नवरगाव येथील युवकाने घेतला गळफास

 

– सलग दुसऱ्या आत्महत्येने मारेगाव तालुका प्रभावित 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

तालुक्यातील नवरगाव (धरण )येथील 26 वर्षीय युवकाने स्वगृही गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारला सायंकाळी 6 वाजता घडली. तालुक्यातील सलग दुसऱ्या आत्महत्येने समाजमान सुन्न होवून पुरता तालुका प्रभावित झाला आहे.

 

कपील रविंद्र परचाके असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

अख्ख कुटुंब मोलमजुरी करून जीवनाचा व कुटुंबाचा गाडा हाकत असतांना कपीलही मोलमजुरी करायचा.मात्र मागील काही दिवसापासून तो घरीच राहायचा. आज कपील वगळता सर्वच कामाला गेले होते. सायंकाळी थोरला भाऊ घरी येताच कपील हा गळफास घेवून मृतावस्थेत आढळला.

आत्महत्येचे नेमके कारण तूर्तास अस्पष्ट आहे. कपीलच्या पश्चात आई, वडील व दोन भाऊ आहे.

परिणामी, मारेगाव तालुक्यात सलग आणि वाढत्या आत्महत्येच्या रिघाने जनजागृतीची चळवळ राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, सकाळी केगाव व सायंकाळी नवरगाव येथील आत्महत्येने तालुका प्रभावित झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment