वेदनादायी.. लाडक्या बहिणीला भेटून आलेल्या भावावर काळाचा घाला

 

– मारेगावच्या युवकास वणी येथे ट्रकने चिरडले 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

आईवडिलांसह दोघेच बहीण भाऊ. असं चौकोनी कुटुंबातील मुलीचं लग्न आटोपलं. लाडकी बहीण वरोरा येथे वास्तव्यात असतांना तीला भेटून भाऊ दुचाकीने मारेगावकडे निघाला.मात्र वाटेतच त्याचेवर क्रूर नियतीने डाव साधला. ट्रकने चिरडून करून अंत झाला. एकुलता एक असलेल्या भावाच्या अकाली मृत्यूने मारेगावात शोककळा पसरली आहे.

गणेश हरिदास बदकी (27) रा. मारेगाव असे ट्रक धडकेत मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे.

बहिणीची प्रसूती झाल्याने तीला बघण्यासाठी तो गेला होता.आज बुधवारला सकाळी वरोरा येथून दुचाकीने निघाला.वरोरा वणी मार्गांवरील संविधान चौकात मालवाहू ट्रकने गणेश बदकीच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत तो जागीच गतप्राण झाला. अपघात होताच ट्रक चालकाने वणी पोलिसात आत्मसमर्पण केले.

या घटनेने लाडक्या बहिणीची व तिच्या गोंडस बाळाची भेट भावासाठी अखेरची ठरली. गणेशच्या अचानक दुर्देवी घटनेने मारेगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment