– कारण अस्पष्ट : कुंभा येथे हळहळ
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
येथील 27 वर्षीय विवाहित युवकाने शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना 24 जानेवारी रोजी 4 उघडकीस आली.
आकाश नत्थू आस्वले वय 27 वर्षे रा. कुंभा असे मृतकाचे नाव आहे.
मृतक आज सकाळी वडीला सोबत वणी येथील खाजगी रुग्णालयात गेला होता. दुपारी परत आल्यानंतर आकाश शेताकडे गेला. त्याच्या काही वेळेनंतर त्याचा मोठा भाऊ सुद्धा शेताकडे गेला असता तो दिसत नसल्याने भावाने त्याचा शोध घेतला असता तो विहिरीत मृत अवस्थेत आढळून आला.
त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. त्याचा मागे आई-वडील, पत्नी,भाऊ असा आप्त परिवार आहे.