पेट्रोलपंप कामगाराकडून ग्राहकांना तुंबळ मारहाण

 

– पेट्रोल कमी टाकल्याने उफाळला वाद : दोघे जखमी 

– कामगारांच्या मुजोऱ्या वाढल्या

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

तालुक्यातील एका पेट्रोल पंप दुचाकीत पेट्रोल कमी टाकल्याने विचारपूस करणाऱ्या ग्राहकांना पाईपने जबर मारहाण केल्याने प्रकरण पोलिसात जात निवळले.ही मारहाणीची घटना मंगळवारला सकाळी 11 वाजताचे दरम्यान घडली.

 

मारेगाव येथून पश्चिमेस असलेल्या एका पेट्रोल पंपवर तिघे जन दुचाकी घेवून आलेत.कामगार पेट्रोल भरतांना दुचाकीत सांगितल्या प्रमाणे कमी भरण्यात आले. याबाबत दुचाकीस्वारांनी जाब विचारताच दोन कामगारांनी दुचाकीवरील दोघांना रबरी पाईपने चांगलेच बदडले. हे कमी म्हणून की काय एकाने चक्क पकडून दुसऱ्यास फटके मारले.

 

विशेष म्हणजे मारेगाव तालुक्यातील काही निवडक पंपवर कमी पेट्रोल टाकण्याचा राजरोसपणे गोरखधंदा सुरु असल्याची ओरड वाहन धारकात आहे.यातच विचारपूस केल्यास उर्मट भाषेत उत्तर देत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. पेट्रोलपम्प संचालकांनी विहित वेळेत कामगारांना आवर घालावा अशी नागरिकांची मागणी आहे.

 

दरम्यान, पेट्रोलपंप वरील मारहाणीत तालुक्यातील दोघे जन किरकोळ जखमी झाले. एकमेकांविरोधात तक्रार देण्यास पोलीस स्टेशन गाठले मात्र तक्रार न होताच हे तुंबळ हाणामारीचे प्रकरण येथे निवळले.याच दरम्यान पोलीस स्टेशन समोर मोठ्या प्रमाणात जमाव होता. अनेकांच्या तोंडातून कामगारांच्या नेहमीच्या उद्धटपणाची व मुजोरीची चर्चा जोरकसपणे रंगत संताप व्यक्त होत होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment