– पहापळ येथील दोन युवक मित्रांच्या मृत्यूने पंचक्रोशी हादरली
– निंबाळा नजिक झाला होता अपघात
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मागील मंगळवारला वणी वरून मारेगावाकडे येणाऱ्या दुचाकीस्वार दोन मित्रांचा अपघात होवून गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही नागपूर येथे उपचारदरम्यान आज शनिवारला पहाटे श्वास थांबल्याने पहापळ येथे शोककळा पसरली आहे.
विजय संभाजी थेरे (35), नितीन खुशाल पायघन (28) रा. पहापळ असे मृत्यू पावलेल्या युवकांचे नाव आहे.
हे दोघेही हिरो होंडा दुचाकी क्रमांक एम एच 31 एच 340 ने वणीवरून मागील 7 जानेवारी रोजी रात्री 10 वाजताचे दरम्यान मारेगाव मार्गे स्वगावी जाण्यास निघाले. वाटेत निंबाळा राज्य महामार्गांवर जनावर आडवे आल्याने जबर धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.
गंभीर दोघांनाही पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले.मात्र कोमात असलेल्या गंभीर जखमी विजय याने पहाटे अखेरचा श्वास घेतला. काही वेळातच नितीन याचाही मृत्यू झाल्याने दोन तरुण युवकाच्या मृत्यूने पंचक्रोशी हादरली असून पहापळ येथे शोककळा पसरली आहे.
परिणामी, विजय थेरे याच्या पश्चात आई, पत्नी व 6 वर्षाची मुलगी आहे तर नितीन पायघन हा अविवाहित होता. नितीन याच्या पश्चात आई वडील व बहीण आहे.