संवेदना… धामणीचे माजी पोलीस पाटील शामराव पिंपळकर यांचे निधन

 

– धामणी – मारेगाव चे पोलीस पाटील भास्कर पिंपळकर यांना पितृशोक 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

तालुक्यातील धामणी येथील ज्येष्ठ नागरिक तथा माजी पोलीस पाटील शामराव पिंपळकर (89) यांचे वृद्धपकाळाने रविवारला रात्री 9 वाजता स्वगृही निधन झाले.

 

शेती हा मुख्य व्यवसायात पारंगत असलेल्या शामरावजी पिंपळकर यांनी तब्बल 25 वर्ष दीर्घकाळ पोलीस पाटील म्हणून कार्यकाळ काढत सन 1996 मध्ये सेवानिवृत्त झाले होते.

 

रविवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी छबुताई, 5 मुलं व एक मुलगी आहे. स्थानिक स्मशानभूमीत त्यांचेवर आज दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment