– मारेगाव येथे सायंकाळी 5 वाजता होणार अंत्यविधी
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
येथील सेवानिवृत्त शिक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार हरिप्रसाद पांडे यांचे वृद्धापकाळाने वणीस्थित निधन झाले. मृत्यूसमयी त्याचे वय 89 वर्षाचे होते.
मारेगाव येथील आदर्श हायस्कुल मध्ये हिंदी विषयाचे शिक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. मारेगावच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक व संस्कृतीक चळवळीला जोपासत त्यांनी प्रथम पत्रकारितेचा वसा चालविला. महाराष्ट्रातील आघाडीचे मराठी दैनिकात त्यांनी पत्रकार म्हणून पाय रोवत तालुक्याचे प्रतिबिंब उमटविले होते. मागील अनेक वर्षांपासून प्रकृतीच्या अस्थर्यामुळे वणी येथे वास्तव्यात होते.
आज रविवारी सकाळी 9.15 वाजता त्यांची प्रांणज्योत मालविली. त्याचे पार्थिव दुपारी 2 वाजता मारेगाव येथील लर्नन्स अकॅडमी स्कुल मध्ये अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता मारेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
स्व. हरिप्रसाद पांडे यांच्या माठीमागे पत्नी गीतादेवी, संपादक, शैलेश पांडे, नायब तहसीलदार विवेक पांडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कल्पना माळोदे (पांडे ), प्रा. सतीश पांडे असा आप्तपरिवार आहे.
( मा. ज्येष्ठ पत्रकार स्व. हरिप्रसाद पांडे काका यांना विदर्भ टाईम्स व मारेगाव प्रेस संपादक पत्रकार संघ कडून भावपुर्ण श्रद्धांजली )