– शुभम संजय काकडे याचेवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव येथील शुभम संजय काकडे या तरुणाने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यश संपादित केले आहे.ग्रामिण भागातील शुभमने विद्यादानेतून मिळविलेल्या प्रेरणादायी यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शुभमचे दहावी पर्यंतचे शिक्षण येथील विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये झाले.यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा येथे बारावी उत्तीर्ण होत तो नागपूर इस्लॉप कॉलेज मधून पदवीधर होतांना नागपूर येथूनच सीए साठी आवश्यक असणारी आर्टिकल शीप यशस्वीपणे पूर्ण करून सीए परीक्षेत घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झाला.
आई गृहिणी, वडील वणी पंचायत समितीला सहाय्यक लेखाधिकारी असून मारेगाव सारख्या ग्रामिण भागातील न्यूनगंड बाजूला सारत नियोजन पद्धतीचे अभ्यासातील सातत्य आणि जिद्दीने मिळविलेले यश ईतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असेच आहे.
शुभम ने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेला घातलेल्या गवसणीने त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.