– मारेगावात दोस्तो की दुनियादारी
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
काळानुरूप परिवर्तीत झालेले शाळेचे शिक्षण. उभ्या आयुष्यात प्रामुख्याने शाळेतील इयत्ता आणि तुकडी नसते. स्वकीयांचा किव्हा स्वतःचा शोध घ्यायला, नवागत शिकायला मापदंड नसतो. किंबहुना तुम्हाला वेळही देत नसते. मारेगाव येथील आदर्श हायस्कूल शाळेतील दहावीच्या 1988 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आजच्या धकाधकीच्या जिवनात, कामाच्या व्यापात प्रत्येकजण गुंतलेला असतांना स्वतःचा आनंद विसरून गेलेला आहे.आदर्श हायस्कुलचे जुने पुराने मित्र विखुरलेल्या पाखराप्रमाणे तब्बल 36 वर्षानंतर मारेगावात एकत्र आले अन जमलेल्या मैत्रीचा एका कोपऱ्याने शालेय मित्रांची पुन्हा वीन घट्ट झाली.
प्रसंग होता करणवाडी येथील विसावा येथील हिरव्याकंच हॉटेलमधील. 1988/89 मधील शैक्षणिक वर्षातील सर्व वर्गमित्रांचा मिलाप व्हावा या सकारात्मक उद्देशाने चिरंजीलाल मेहता यांनी पुढाकार घेत व्हाट्सअप ग्रुप तयार केला. ग्रुपच्या माध्यमातून एकत्रीत येण्याचा संकल्प झाल्यानंतर ‘विसावा’ मध्ये सर्व मित्र एकत्र येत आपल्या दृढ मैत्रीवर शिक्कामोर्तब केला.यावेळी थिरकत , विनोदी किस्से, गप्पा, जुन्या आठवणी यासह आपली आत्तापर्यंतची वाटचाल मित्रांनी एकमेकांना शेअर केली. तत्पूर्वी शालेय जीवनातील मृत सोहम कायरकर, विजय काळे, श्रीराम सिडाणा, राजु ताठे यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली.
मित्रांची सारखी भेट न होता देखील जिथे या मनातलं त्या मनाला अचूक कळतं असा मैत्रीचा एक कोपरा अर्थात या मिलापात अविस्मरणीय आठवणीच्या गप्पा मनसोक्त मारत शालेय जिवनातील जुन्या सुवर्णक्षणांच्या आठवणीला उजाळा देत मनाच्या कप्प्यात साठविण्यात आला. याप्रसंगी दहावीतील वर्ग मित्रात तानेश पावडे, सुभाष दूधकोहळे, दीपक डोहणे, संजय काळे, राजु चौधरी, महेंद्र लिहीतकर, विलास ठक, संजय साठे, संजय ठावरी, विनोद घोटेकार, सुधीर पिंपळशेडे, प्रशांत पाचभाई, कवडू खीरटकर, प्रदीप राऊत, पारस नगराळे, दिलीप आडकीने, राजु किन्हेकार, दिलीप कर्दलवार, रवी मांडवे, धीरज दुपारे, चिरंजीलाल मेहता, सुनील दुर्गे यांचा सहभाग होता.