– केगाव येथील घटनेने शोककळा
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
अचानक निसर्गात बदल होत ढगाळी वातावरण आणि विजेचा कडकडाट सुरु झाला.अशातच शेतकरी महिला शिवारातून घरी परतत असतांना वीज पडून जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना आज शुक्रवारला सायंकाळी साडेपाच वाजताचे दरम्यान घडल्याने ग्रामस्थात शोककळा पसरली आहे.
मेघा गणपत पानघाटे (55) रा. केगाव (वेगाव ) असे वीज पडून ठार झालेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे.
दिवसभर ढगाळी वातावरण आणि अकाली पावसाच्या सरी सुरु झाल्यागत सायंकाळी अचानक ढग दाटून येत मुसळधार पाऊस सुरु झाला. यातच विजेचा कडकडाट सुरु असतांना केगाव शिवारात ठेक्याने शेती करणाऱ्या मेघा पानघाटे ही शेतकरी महिला घराकडे परतत होती. थेट तिच्या अंगावर वीज कोसळून जागीच ती जागीच गतप्राण झाल्याची दुर्देवी घटना घडल्याने केगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे.
परिणामी, मृतक महिलेचे शव मारेगाव रुग्णालयात आणण्यात आले असून मृत मेघा पानघाटे हिच्या पश्चात पती, एक मुलगा व एक मुलगी आहे.