आयसर पिकअपच्या धडकेत तिघे जखमी

 

– एक गंभीर : शिवनाळा फाट्यानजीकची घटना 

– चालक वाहक घटनास्थळावरून पसार 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

समोरासमोरून येणाऱ्या आयसर व पिकअप वाहन एकमेकास धडकल्याने तिघे जखमी झाले तर यातील एक जन गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजताचे दरम्यान राज्यमहामार्गावरील शिवनाळा फाट्यानजीक घडली.

आयसर वाहन हे यवतमाळकडे जात होते तर विरुद्ध दिशेने पिकअप वाहन येत असतांना दोघेही एकमेकास धडकले.यात आयसर वाहनातील साहील शेख अमीर (19), सय्यद युसूफ शेख (45), शेख मोहम्मद शेख जमील (32) तिघेही रा. वणी हे जखमी झाले. यातील सय्यद युसूफ शेख गंभीररित्या जखमी झाल्याने तातडीने त्यांना जिल्हास्थळी हलविण्यात आले.

अपघात होताच पिकअप वाहनाचे चालक व वाहकाने घटनास्थळावरून पोबारा केला. पुढील तपास सुरु आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment