मारेगाव तालुक्यात तीन वाघाचे पालथे

 

– वन विभाग मागावर 

  – पशुधनावरील तावाने शेतकऱ्यात भीतीचे सावट  

मारेगाव : कैलास ठेंगणे 

मारेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या 13 बीट मध्ये मागील काही दिवसापासून वेगवेगळ्या तीन वाघाचां वावर असल्याची वन विभागाकडून खात्रीलायक वृत्त आहे. सदर तीनही वाघ वेगवेगळ्या अभयारण्यातून शेकडो किलोमीटरचे अंतर भटकंती करीत अधिवासाचा शोध घेत आहे. वाघ हा अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थान असलेला प्राणी आहे. त्याच्या वावराने तालुक्यातील जैवविविधता जैव साखळी समृद्ध असल्याची निशाणी मिळाली आहे. या तिन्ही वाघाचा मागोवा वन विभागाच्या वतीने सातत्याने घेत असल्याने मानव वन्य प्राणी संघर्ष टळला आहे.

शेतकऱ्यांच्या पशुधनावर हे वाघ ताव मारीत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.

मारेगाव तालुक्यात वनक्षेत्र 7360.21 चौरस मीटर मध्ये विखुरलेले आहे. या जंगलात स्थानिक प्रजातीची झाडे, झुडपे व वेलीस दुर्मिळ औषधी वनस्पती नटलेले आहे. मारेगाव,केगाव,मच्छिंद्र, मार्डी,खंडणी, आवळगाव, चिंचोनी (बोटोणी ) गोंड बुरांडा, खैरगाव, वाढोणा, आंबेझरी, वाघधरा,दुर्गडा ह्या बीटच्या माध्यमातून सतत वन्य प्राण्यांच्या हालचालीवर वन विभागाची करडी नजर आहे. मात्र मागील महिन्यापासून वाघाच्या अस्तित्वाच्या खुणा जाणवत आहेत.

जंगल भागात वन्य प्राण्यांची शिकार होत आहे. जंगलातील कॅमेऱ्याची तपासणी केली असता तीन वाघाची छबी कॅमेरात कैद झाली. वाघ जंगल भागात फिरत आहे. ह्या तीन वाघातील एक नर आहे तर दोन वाघीण आहे. डिसेंबर ते फरवरी हा वाघांचा प्रणय काळ असल्याने हे वाघ एकामेकाच्या शोधात भटकती करीत आहेत. मात्र वाघाच्या अस्तित्वाने जंगलालगतच्या शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त करण्यात येत आहे तर काही शेतकऱ्यांच्या पशुधनावर वाघाने ताव मारला. या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

वाघ कुठून आले….?

वनपरिक्षेत्रात आढळून येत असलेले हे वाघ शंभर ते दीडशे किमी प्रवास करून आले आहेत. यातील एक वाघ राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प ताडोबा येथून आला आहे, दुसरा वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातून, टिपेश्वर अभयारण्यातून आला आहे.

 

ग्रामस्थांनी वापर टाळावा

मानव वन्य जीवातील संघर्ष टाळण्यासाठी जंगल परिसरातील ग्रामस्थांनी अवेळी जंगलात जाणे टाळावे. त्यामुळे वन्य जीवाचा वावर व त्याच्या अधिवासावर मर्यादा येत असतात. जंगल भागात जाणे टाळून रात्रीला पशुधन शेत शिवरात ठेवू नये असे आव्हान वन विभागाकडून करण्यात आले आहे.

 

तीन वाघ वन क्षेत्रात भटकंती करीत आहे. या वाघांचा मागोवा सतत वन विभागाच्या पथकामार्फत सुरू आहे. जंगल व्याप्त भागात कॅमेरे लावण्यात आले आहे. मानव वन्य प्राणी संघर्ष टाळण्याकरिता सतत मार्गदर्शन केले जात आहे.

        शंकरराव हटकर    

वनपरिक्षेत्र अधिकारी, मारेगाव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment