शाळेच्या परिसरातील धमकी देत बालिकेची काढली छेड

 

पिडीत बालिका दहाव्या वर्गात 

– मारेगाव तालुक्यातील 19 वर्षीय युवक गजाआड

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

ती दहाव्या वर्गात. नवरगाव येथे तालुका स्तरीय क्रीडा सामने बघत असतांना मैत्रिणी सोबत पाणी पिण्यास बाहेर निघाली. सगणापूर येथील तरुण तिचा हात पकडत माझ्याशी का बोलत नाही म्हणत छेड काढतो व कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देतो. या अनाहुत प्रसंगाने पूर्णतः घाबरते. घरी जावून ढसाढसा रडत असतांना कॉलेज मधून भाऊ येतोय. झालेली आपबिती कथन करीत थेट मारेगाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल करते. संशायितावर रात्री पोस्को व अँट्रॅसिटी अंतर्गत गुन्हे दाखल होवून गजाआड करण्यात येते. ही घटना गुरुवार रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे.

 

आशिष उर्फ गोलू रमेश धानोरकर रा.सगनापूर असे संशायित आरोपीचे नाव आहे.

 

संशायित याने तीन वर्षांपूर्वी एका विवाहित महिलेची छेडखाणी केली होती. सदर पिडीत बालिकेसोबतही सातत्याने लगट लावत होता.मात्र ताकीद देवून सामंजस्याने हे प्रकरणे निवळली होती. मात्र,सदर पिडीत मुलीवर गत दोन महिन्यापासून पाळत ठेवून अधूनमधून बहाण्याने तो तिला धमकीवजा टोमणे मारत असे.

 

नवरगाव (धरण )गुरुवारला शालेय क्रीडा सामने असतांना पिडीत बालिका सामने बघत होती. सामना सुरु होण्यापूर्वी ती मैत्रिणी सोबत पाणी पिण्यास प्रांगणाच्या बाहेर आली तोच चक्क तिची छेड काढू लागला. एवढेच नव्हेतर कुणाला सांगितल्यास तुला आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीने ती पूर्णतः बिथरली अन घाबरली.

 

सामने बघणे सोडून ती स्वगावी गेली. घरी ढसाढसा रडत असतांना भाऊ कॉलेजमधून घरी आला. आई वडील नातेवाईकांकडे गेले होते. भावाला आपबिती कथन केल्यागत थेट पोलीस स्टेशन गाठले. तक्रार दाखल होताच संशायित आरोपी आशिष रमेश धानोरकर (19) याचेवर पोस्को कलम 74,75,78,8,12 अनु. जाती जमाती प्रतिबंधक कायदा 3 (1), 3 (2) नुसार गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment