– अप्पर जिल्हाधिकारी यांचे न्यायालयाचा निर्वाळा
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मार्डी येथील सरपंच हे वाजवीपेक्षा जास्त ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप व त्यांची असलेली संस्था जागेवरील कर भरणा करीत नसल्याचा दावा सूरज पंडीले व अनंता जुमडे यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात दाखल केला. या प्रकरणात सचिव यांनाही गोवण्यात येवून न्यायालयाने दिलेल्या आदेशात हा दावाच नामंजूर करण्यात आल्याने अर्जदारांना मोठी चपराक बसली आहे.
येथील सरपंच रविराज चंदनखेडे व सचिव यांचे विरोधात उभयतांनी चंदनखेडे हे ग्रामपंचायत कारभारात अधिकचा हस्तक्षेप व त्यांची असलेली समता बहुउद्देशीय संस्था कर भरत नसल्याच्या आक्षेपासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात धाव घेतली मात्र हा दावा खारीज करीत न्यायालयाने नामंजूर केल्याचा निर्वाळा दिला आहे.
यात सरपंच हे प्रशासकीय कारभारात प्रत्यक्ष सहभाग घेवून लाभ घेतल्याचा आरोप करीत सभासदत्व रद्द करण्याचा विवाद अर्ज सादर करण्यात आला होता.
सचिव यांनी मालमत्ते संबंधी कर आकारणी, वसुलीबाबतची प्रचलित अधिनियम व प्रशासकीय कामकाजात कोणताही कसूर केला नसून नियमानुसार कार्यवाही केली जाते. यात कोणाचाही हस्तक्षेप आणि प्रत्यक्षात सहभाग नसल्याचे नमूद केल्याने व अर्जदार यांचा अर्ज, गैअर्जदार यांचा लेखी जवाब, सचिव यांचा अहवाल, गैरअर्जदार – अर्जदार यांचा लेखी युक्तिवाद व इतर कागदपत्रांचे अवलोकन करून प्रकरण खारीज करण्याचा निर्वाळा देण्यात आला.