‘वर्षा’ भिनंदन… फटाक्याच्या आतिषबाजीने नव्या सरकारचे मारेगावात स्वागत

– राष्ट्रवादीचे दयाल रोगे, भाजपचे अविनाश लांबट सह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
गुरुवारला सायंकाळी महाराष्ट्रात शपथग्रहण करीत महायुती सरकार आरूढ झाल्यानंतर मारेगाव स्थित मार्डी चौकात फटाक्याची आतिशबाजी करीत महायुती पदाधिकारी यांनी हर्षानंद साजरा केला.

महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आझाद मैदानात गुरुवारला सायंकाळी शपथग्रहण सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शपथग्रहण केली.

हा अभूतपूर्व सोहळा मुंबई येथे सुरु असतांना मारेगाव तालुका महायुती च्या वतीने मार्डी चौकात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात येवून जयघोषाचे नारे सह टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दयाल रोगे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांचेसह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment