मन हेलावणारी घटना… मारेगावच्या युवकावर नागपुरात काळाचा घाला

 

– कुटुंबाचा आधार असलेला मोहीत उज्वलकर यांचे अपघाती निधन 

– एकुलत्या एक होतकरू मुलाच्या एक्झिटने पंचक्रोशीत हादरली 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

मावस बहिणीच्या लग्नाला गेलेल्या नागपूर येथे मारेगाव च्या युवकाचा अपघात होवून जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना गुरुवारला मध्यरात्री घडल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

मोहीत उर्फ ओम बंडू उज्वलकर रा. मारेगाव असे अपघातात ठार झालेल्या 23 वर्षीय युवकाचे नाव आहे.

मोहीत याच्या मावस बहिणीचे लग्न असल्याने हळदीचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने दिघोरी रोड ला असलेल्या नातेवाईकांकडे आराम करण्यासाठी जात असतांना अज्ञात वाहनाने मोहितच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक बसताच मोहीत खाली कोसळला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने जागीच गतप्राण झाल्याची घटना गुरुवारला मध्यरात्री नागपुरात घडली.

दरम्यान, मोहीत याचे वडील अर्धांगवायू आजाराने पिडीत आहे.कुटुंबाचा आधारवड असलेला मोहीत हा मारेगाव स्थित चहा चा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. अशातच मन सुन्न करून टाकणाऱ्या मोहीत च्या दुर्देवी घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

परिणामी, मृतक मोहीत याच्या पश्चात आई, वडील व लहान बहीण आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment