– मारेगाव येथील घटनेने हळहळ
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव येथील वार्ड नंबर दोन मधील विवाहित युवकाने राज्य महामार्ग जुन्या कोर्ट मागे असलेल्या शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना निदर्शनास आल्याने घटनास्थळी बघ्याची तोबा गर्दी उसळली आहे.
मारोती अंबादास आत्राम (32) रा. मारेगाव असे आत्महत्या केलेल्या विवाहित युवकाचे नाव आहे.
मारोती हा मारेगाव येथील एका किराणा दुकानात कामगार होता. पत्नी व दोन मुले असा कुटुंबाचा काफीला असतांना आज सकाळी 9 वाजताचे प्रांत:विधीला गेलेल्या एका युवकास तो लिंबाच्या झाडाला मृतावस्थेत आढळला. दरम्यान, रात्री उशिरा त्याने गळफास घेतल्याचा कयास व्यक्त होत आहे.
मृतक याने एका बुकावर आपल्या आत्महत्येचे कारण लिहिले असावे. तशा आशयाचे बुक लिंबाच्या झाडाखाली निदर्शनास आले. आत्महत्येचे नेमके कारण सुसाईड नोट मध्ये दडलेले असावे अशी साशंकता व्यक्त होत आहे.परिणामी, घटनास्थळावर बघणाऱ्यांची रिघ लागली आहे.