कालवे नादुरुस्त : रब्बी हंगाम धोक्यात

 

– शेतकऱ्यांचा टाहो : सगनापूर येथील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

नादुरुस्त कालव्यातून पाणी पुरवठा करणारी पाटसरीही तहानलेली असल्याने शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. दरवर्षीची मृदू व जलसंधारणाची यंदाही जैसे थे ही समस्या शेतकऱ्यांच्या मानगूटीवर बसून असल्याने सगनापूर येथील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

तलावातून कालवा व्हाया पाटसरीतून सगनापूर परिसरातील शेकडो एकर वरील शेतात प्रामुख्याने सिंचन केल्या जाते मात्र झाडाझुडपांणी वेढलेला कालवा जागोजागी नादुरुस्त व फुटलेल्यावस्थेत आहे.त्यामुळे पाटसरीला पाणी येत नसल्याने येथील शेतकऱ्यांना रब्बी पिकापासून मुकावे लागत असल्याची विदारक स्थिती संबंधित विभागाने शेतकऱ्यांवर आणून ठेवली असल्याने शेतकऱ्यात संताप व्यक्त होत आहे.

तूर्तास चना, गहू , मूग, जवस, वटाणा आदी रब्बी पिकांचा हंगाम असल्याने आणि पाणी पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पूर्णतः डबघाईस येण्याची संभाव्य शक्यता बळावल्याने शेकडो शेतकरी रब्बी हंगामातील सिंचनापासून वंचित राहणार आहे.

त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना करून सिंचनाचा मार्ग तात्काळ सुकर करावा अन्यथा शेतकरी आंदोलन छेडेल असा ईशारा मनोज चौधरी, दत्तात्रय वानखेडे, अंकुश कोहळे, बबन भारसाकडे, देवानंद वानखेडे, यांचेसह शेतकऱ्यांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment