– महाविकास आघाडीचे संजय देरकर 15 हजार 560 मतांनी विजयी
– असे पडले सर्व उमेदवारांना मतदान, वाचा ‘विटा’ वर
मारेगाव : दीपक डोहणे
वणी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी समर्थित उबाठा पक्षाचे उमेदवार संजय देरकर यांनी भाजप चे संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा जवळपास 15 हजार 560 मतांनी पराभव करीत विजय संपादन केला.
महाविकास आघाडीचे संजय देरकर यांचे समवेत माजी आमदार वामनराव कासावार सह कार्यकर्त्यांनी विधानसभा क्षेत्र पिंजून काढत प्रचार हायटेक केला. प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी राजकीय व्युव्हरचना रचना आखत आज झालेल्या निकालात अखेर पर्यंत मतांची आघाडी कायम ठेवली. सलग दोनदा निवडून आलेले बोदकुलवार हॅट्रिकचा रथ रोखण्यात आघाडीला यश आले.
संजय देरकर यांनी पहिल्या फेरीपासून मतांच्या आघाडीचा रेशो शेवटपर्यंत कायम ठेवत वणी विधानसभेत अपेक्षित परिवर्तन घडवित मशाल पेटविली. जवळपास 15 हजार 560 मतांचे मताधिक्य घेत विजयश्री खेचून आणली.यात संजय देरकर यांना एकूण 94616 तर प्रतिस्पर्धी बोदकूरवार यांना 79058 मते मिळाली.
संजय देरकर यांच्या विजयाने कार्यकर्त्यांनी वणी, मारेगाव व झरी तालुक्यात फटाके फोडत, गुलाल उधळीत जल्लोष साजरा केला.
असे मिळाले उमेदवारांना मतदान
बसपा उमेदवार अरुण खैरे 1163, मनसे उमेदवार राजु उंबरकर 21,977 उबाठा शिवसेना उमेदवार संजय देरकर 94618, भाजप उमेदवार संजीवरेड्डी 79058, भाकप चे अनिल हेपट 3875, वंचित बहुजन आघाडीचे राजु निमसटकर 3605, अपक्ष केतन पारखी 407, संजय खाडे 7540, नारायण गोडे 855, निखिल धूरके 2246, हरीश पाते 1307, राहुल आत्राम 2532,नोटा 1355
अखेर देरकर चवथ्या टर्म ला बनले आमदार
विधानसभा सदसत्वा करिता सातत्याने संघर्ष करणारे संजय देरकर यांनी सन 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून निवडणूक लढविली. त्यानंतर 2004 मध्ये माघार घेत 2009 मध्ये अपक्ष लढत 41 हजार मते मिळविली. 2019 मध्ये परत अपक्ष उमेदवारी दाखल करीत 25 हजार मते मिळवित पराभूत झाले मात्र 2024 च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडी कडून उमेदवारी दाखल करून तब्बल 15 हजारा पेक्षा अधिक मते घेत चौथ्या टर्म ला विजयाचा शिक्कामोर्तब केला.