धक्कादायक…घोडदरा येथील सरपंच सुनंदा आत्राम अपात्र

 

शासकीय जागेवर घर बांधणे भोवले

– स्थगितीसाठी अप्पर आयुक्ताकडे धाव 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

तालुक्यातील घोडदरा ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सुनंदा अशोक आत्राम यांना सरपंच पदावरून अपात्र करण्याचा आदेश निर्गमित करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सुनंदा आत्राम ह्या घोडदरा पेसा अंतर्गत ग्रामपंचायत च्या वर्तमान सरपंच म्हणून कारभार चालवितात.अशातच त्यांचे राहते घर सरकारी जागेवर असून त्यावर पक्के बांधकाम करण्यात आले आहे.ग्रामपंचायत च्या रेकॉर्ड प्रमाणे गाव नमुना 8 मध्ये असेसमेंट लिस्ट मध्ये याबाबतची नोंद घेण्यात आली आहे.सदरील जागा सरकारची असून त्यावर अतिक्रमण करण्यात आले असल्याने येथील संतोष रोगे यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात अपात्रता अर्जित केली होती.याच कारणाने सरपंच यांचे सभासदत्व रद्द करण्यात आल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

स्थगितीसाठी सरपंच आत्राम यांची अप्पर आयुक्ताकडे धाव

   महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम नुसार सरपंच यांना अपात्र घोषीत करण्यात आले. या आदेशाला आव्हान व स्थगितीसाठी आत्राम यांनी अमरावती अप्पर आयुक्ताकडे धाव घेतली असून 11 डिसेंबर पर्यंत स्थगनादेश मंजूर करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment