आत्महत्येची धग…. नवरगावच्या युवतीने घेतला गळफास

 

– कापूस वेचून आलेल्या आईला निदर्शनास येताच फोडला हंबरडा 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

घरात मायलेकी.वडिलांचा दहा वर्षांपूर्वी मृत्यू. आई काबाडकष्ठ करून गुजरान करायची. सोबत मुलगी. आई सकाळी कापसाला. सूर्यास्त होत घरी परतली तोच घरात योवन्नात असलेली मुलगी गळफास घेवून लटकलेली. हा दुर्देवी क्षण पाहताच मायचा एकच हंबरडा. अख्खा गाव जमला. मुलीला रुग्णालयात हलविले अन डॉक्टरांनी मृत घोषीत केले. ही दुर्देवी घटना मारेगाव तालुक्यात नवरगाव (धरण )येथे शनिवारला सायंकाळी उघडकीस आल्याने पंचक्रोशी हळहळली.

 

खुशी सुभाष मोहुर्ले (21) असे घरात गळफास घेवून जीवनयात्रा संपविलेल्या युवतीचे नाव आहे.

 

ती अन आई दोघीच घरी राहायच्या.आई मजुरीला आणि खुशी वणी येथील अकॅडमी प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणार्थी. दोन बहीण विवाहित आणि वडिलांचे निधन. मात्र आज खुशी प्रशिक्षणाला गेली नाही.आई कापूस वेचून घरी येताच दोरीच्या सहाय्याने खुशी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला.

 

तूर्तास खुशीच्या आत्महत्येचे कारण अस्पस्ट असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment