विनयभंग प्रकरणी आरोपीस तीन वर्षे कारावास व दंडाची शिक्षा

 

– मारेगाव न्यायालयाचा निकाल

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

महीलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपी नामे शंकर उर्फ शुभम सुधाकर परचाके वय ३० वर्षे रा.कुंभा ता.मारेगाव जि.यवतमाळ यास तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री के.पी.दवने यांनी दी. ०८/११/२०२४ रोजी सुनावली आहे.

दि.१६.०२.२४ रोजी फिर्यादी व तीचा पती घरून शेतात जात असतांना आरोपी हा मागे येवुन फिर्यादी गावाचे बाहेर निघताच फिर्यादीचे समोर आला. मामा कुठे गेले असे विचारले असता, मामा समोर आहे असे सांगीतले तेव्हा आजुबाजुला कोणीही नसल्याचे पाहुन आरोपीने फिर्यादीचे दोन्ही हात पकडून खाली पाडले व विनयभंग केला त्यावेळी फिर्यादीने जोराने ओरडल्याने पती समोर गेलेले असल्याने त्यांनी आवाज ऐकले व काय झाले म्हणून जवळ आले. तेव्हा आरोपी हा फिर्यादी व तीच्या पतीला तसेच ओरडल्याने जवळ आलेल्या ईतर लोकांना तुम्ही कोणालाही सांगीतले किंव्हा पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुम्हाला शेतात येवुन मारुन टाकतो अशी धमकी दिली.

सदर घटनेची तक्रार फिर्यादीने पोलीस स्टेशन मारेगाव येथे दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादवी कलम ३५४,३५४(ब),५०६ अंतर्गत गुन्हा नोंद केला. गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार श्री सुरेन्द्र टोंगे यांनी करुन प्रकरण न्यायप्रविष्ट केले. प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी यांचेसह आठ साक्षदारांचे बयाण नोंदविण्यात आले. बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली आहे.

यात सरकारी पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी वकील श्री पी डी कपुर व सौ.खांडरे व ठाणेदार मारेगाव श्री.साळुंके यांचे मार्गदर्शनात कोर्ट पैरवी पोका विष्णु कुमरे यांनी काम पाहिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment