– मतदार परिवर्तनाच्या मानसिकतेत…
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
विधानसभेच्या रिंगणात सर्वच उमेदवाराने प्रचाराचे नारळ फोडल्यानंतर मनसेने प्रचारात आघाडी घेतली. मनसेचे अधिकृत उमेदवार राजू उंबरकर यांच्या कार्याची माहिती देत या निवडणूकीत मनसेला मतदार साद देत आहे.मतदार परिवर्तनाच्या मानसिकतेत दिसून येत आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, झरी, मारेगाव तालुक्यातील सर्व गावात पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी पायाला भिंगरी बांदून महिला, युवक शेतकरी, शेतमजुर, व्यापारी, व्यावसायिक यांच्या भेटीगाठी घेत आहे.
मतदारसंघांत राजू उंबरकर यांच्या मनसेचे “स्ट्राँग नेटवर्क” असून हे पदाधिकारी सकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत मतदारांच्या भेटी घेऊन या निवडणूकीत आपलाच उमेदवार कसा सरस याची मांडणी करत आहे. या आधारावर आपल्या उमेदवाराला इंजिन या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात येतं आहे. मनसेच्या या आवाहनाला मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून या निवडणूकीत परिवर्तनाची नांदी बघावयास मिळत आहे.