कुणबी समाजा बद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा वाद चिघळला

 

१० नोव्हेंबर पासून नागपूर धरणे आंदोलन

भाजपाची डोकेदुखी वाढली

हा राजकीय षडयंत्राचा भाग – भाजपा

 

मारेगाव : कैलास ठेंगणे 

 

वणी येथे भाजप उमेदवाराचा प्रचार कार्यालयाच्या उद्घाटना वेळी एका कार्यकर्त्यांने कुणबी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याचे तीव्र पडसाद आता राज्यभर पसरत असल्याने भाजपाची मोठी डोकेदुखी वाढली आहेत.तर दुसरीकडे कुणबी समाजा च्या वतीने नागपूर येथे 10 नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याने निवडणुकीच्या काळात भाजपाची कोंडी होणार असल्याचे चित्रं दिसत आहेत.

 

या घटनेचे तीव्र पडसाद उमटतात शेकडो कुणबी बांधवांनी वणी पोलीस ठाण्यात धडक देत आक्षेपार्ह व्यक्तव्य करणाऱ्या सुधीर साळी नामक व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ विविध कलमाने गुन्हे दाखल केले. या घटनेनंतर यवतमाळ, चंद्रपूर नागपूर सह राज्यातील विविध जिल्ह्यातील कुणबी समाज बांधवांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत सुधीर साळी विरुद्ध पोलिसात तक्रार देत निषेध करण्यात येत आहे.

 

चंद्रपूर नागपूर मध्ये तीव्र पडसाद 

कुणबी समाजाबद्दल भाजप कार्यकर्त्यांने अतिशय खालच्या भाषेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहे. या प्रकरणाचा निषेधार्थ सर्व कुणबीय शाखेच्या वतीने 10 नोव्हेंबर पासून नागपूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच भाजपाने समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या पत्रकार परिषदेला अशोक काकडे, कल्पना मानकर,पुरुषोत्तम शहाने,जानराव केदार,राजेंश काकडे सह आदी उपस्थित होते.

 

या प्रकरणाचे पडसाद चंद्रपूर जिह्यातही उमटले.कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष अँड.पुरुषोत्तम सातपुते यांनी बोलविलेल्या बैठकीत साळी यांचा निषेध करण्यात आला.यावेळी रामनगर पोलीसात साळी विरोधात तक्रार दाखल केली.

 

हे राजकीय षडयंत्र- उमेदवार बोदकुलवार

या वक्तव्यामुळे भाजपचा अडचणीत वाढणार असे दिसताच उमेदवार बोदकुलवार यांनी उशीरा का होईना पत्रकार परिषद घेत कुणबी समाजाचा भावना दुखवणारे असे कोणी वक्तव्य कोणीच केले नाही. दोन कार्यकर्त्यां मध्ये शब्दिक वाद झाला होता. यावेळी असे कोणीही बोलले नाही असे सांगत हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

कुणबी समाजाची मते कोणाच्या पत्थ्यांवर?

कुणबी समजाबद्दल कथित वक्तव्या वरून समाजामध्ये तीव्र रोष व्यक होत आहेत. त्यामुळे वणी विधानसभेत कुणबी समजाची मते सर्वाधिक आहे. ह्या मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर, महायुतीचे संजयरेड्डी बोदकुलवार, मनसेचे राजु उंबरकर, काँग्रेस बंडखोर उमेदवार संजय खाडे, यांच्यात चौरंगी लढतीचे चित्र आहे. यात भाकप चे अनिल हेपट, वंचित बहुजन आघाडीचे राजु निमसटकर हे ही उमेदवार आहे. त्यामुळे कुणबी समाजाची मते कोणाचा पथ्यावर पडणार हे येणारा काळ सांगणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment