– विधानसभा क्षेत्र काढताहेत पिंजून : प्रचाराचा उच्चाँक
मारेगाव : दीपक डोहणे
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापत आहे. प्रचारासाठी आता आठवडा उरला आहे. सभा, बैठका आणि मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या पत्नी व नारीशक्ती एकवटून संगीता खाडे या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. सध्या त्या वणी विधानसभा क्षेत्रातील वणी शहर व ग्रामीण भागात गावसभा घेत संजय खाडे यांच्या विजयासाठी आवाहन करीत आहे. यात त्यांना माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या पत्नी किरण नांदेकर तसेच महिलाशक्तीची साथ मिळाली आहे.
संगीता खाडे सहकारी महिलांसह प्रचाराचा धुराळा उडवीत आहे. कधी वणी शहर तर कधी ग्रामीण भागाचा त्यांचा दौरा असतो. जवळपास 25 जणांची त्यांची चमू आहे. त्यांच्या प्रचारात पदयात्रा, बैठका, कॉर्नरसभा तसेच गृहभेटींचा समावेश आहे. ही चमू घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात. महिला थेट भेटीला येत असल्याने गावकरी महिला देखील या चमुशी मुक्तपणे संवाद साधतात.
आता पर्यत या महिलांच्या चमुनी संपूर्ण वणी शहर पिंजून काढले आहे. सध्या त्यांचा ग्रामीण भागातील दौरा सुरु आहे. आतापर्यंत विधानसभा क्षेत्रातील शेकडो गावात या महिलांनी दौरा केला आहे. त्यांच्या प्रचाराला महिलांचा देखील उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे.प्रचार दौ-यात महिला सक्षमीकरण, आरोग्य, रोजगार, शिक्षण, स्वयंरोजगार इत्यादी महिलांच्या विषयांचा भर असतो.
त्यामुळे वाढत्या प्रचाराने विधानसभा क्षेत्रात वेगळा पर्याय म्हणून संजय खाडे यांचेकडे मतदार सकारात्मक दृष्टीने बघत आहे.