🔹 शहरासह ग्रामीण भागात कार्यकर्त्यांच्यां मतदारांशी भेटी गाठी
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
विधानसभेची रणधुमाळी चालू होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वणी विधानसभा मतदारसंघासाठी राजू उंबरकर यांचे नामांकन दाखल करण्यात आले. हे नामांकन दाखल होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली. वणी, मारेगाव, झरी, मुकुटबन, पाटण शहरासह ग्रामीण भागामध्ये कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घराघरापर्यंत जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेत पक्षाच्या व उमेदवारांच्या भूमिका विषद करण्यावर भर देण्यात येत आहे.
राजु उंबरकर यांच्या १८ ते २० वर्षांच्या कार्यकाळातील सामाजिक कार्याची, आंदोलनाची आणि उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहचवून या निवडणुकीत राजु उंबरकर यांना मतदान करून वणी विधानसभा मतदारसंघावर मनसेचा झेंडा फडकविण्याचे आवाहन मतदारांना करण्यात येत आहे.
मनसे पदाधिकारी, महीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने भेटी गाठीचा धडाका सुरु करण्यात आला असून या प्रचाराला मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने या निवडणुकीत मनसे विजयाच्या उंबरठ्यावर पोहचण्याचा जोरकस प्रयत्न चालविला जात आहे.