मर्डर… दोघा मिळून ओढणीने आवळला ‘त्याचा’ गळा

 

– मारेगाव तालुक्यात मध्यरात्रीची घटना 

– कुंभा येथील दोघे गजाआड

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

तालुक्यातील कुंभा येथील दोघांचा बाबई पोड येथील एका सोबत शाब्दिक वादाचे रूपांतर चक्क हत्येमध्ये झाल्याने मारेगाव तालुका पुरता हादरला आहे. ही घटना 25 आँक्टोबर रोजी मध्यरात्री कुंभा श्रीरामपूर रोड लगत घडली.

 

तालुक्यातील बाबई पोड येथील भिमराव तुकाराम मडावी (36)यांचे सोबत कुंभा येथील गोलू पुसदेकर व संतोष पडोळे यांचा सायंकाळच्या सुमारास कुंभा येथे शाब्दिक वाद झाला.हा वाद दोघांना जिव्हारी लागल्याने पुसदेकर व पडोळे हे मडावी यांच्या पाळतीवर होते.कुंभा येथून मडावी हे उशिरा स्वगावी पायदळ जात असतांना काही अंतरावर कुंभा येथील दोघांनी मडावी यास गाठून चक्क ओढणीने गळा आवळून हत्या केली.यात संशायितांकडून गळफास घेतल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेगळ्या दिशेने तपासाची चक्रे फिरविल्याने शंकेला पेव फुटले.शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्याने हत्या केल्याच्या साशंकतेवर शिक्कामोर्तब झाले.

 

दरम्यान, कुंभा येथील संतोष ढवळे व गोलू पुसदेकर यांना मारेगाव पोलिसांनी ताब्यात घेत बाजीरावचा प्रसाद देताच दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिली.कुंभा येथील दोघांवर हत्या केल्याचे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.

 

पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय सोळंखे,उपनिरीक्षक प्रमोद जिड्डेवार यांचेसह जमादार अजय वाभीटकर, रजनीकांत पाटील, इकबाल शेख, विजय वानखेडे करीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

1 thought on “मर्डर… दोघा मिळून ओढणीने आवळला ‘त्याचा’ गळा”

Leave a Comment