शक्तिप्रदर्शनात मनसे चे राजु उंबरकर यांचा उमेदवारी अर्ज

– वणी विधानसभेत जणांचे अर्ज दाखल
मारेगाव : दीपक डोहणे
वणी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून राजु उंबरकर यांनी आज दि. 25 आँक्टोबर रोजी हजारो कार्यकर्ते व समर्थकांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत वणी उपविभागीय अधिकारी यांचेकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रिमो मा. राज ठाकरे यांनी विदर्भातील हुकमी एक्का असलेले राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांची सर्वप्रथम उमेदवारी जाहिर केली. आज सर्वप्रथम उंबरकर यांनी नामांकन दाखल करीत उमेदवारीचा मुहूर्त रोवला.याप्रसंगी वणी मारेगाव झरी तालुक्यातील अर्चना बोदाडकर, माजी नगरसेवक नानू त्रिंबके, अलका टेकाम, निर्शाद खान,फाल्गुण गोहोकार, शंकर वरघट, रुपेश ढोके, चांद बहादे, गजानन मिलमीले, शुभम भोयर, अनिस सलाट, मयूर गेडाम, अजित शेख, तुषार गबराणी यांचेसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित मेळाव्यात वणी विधानसभा क्षेत्रातील हजारो समर्थक हजर होते.

वणी विधानसभा क्षेत्रात आज दाखल करण्यात आलेल्या नामांकनात राजु उंबरकर यांचा एकमेव समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment