आत्महत्येची धग… पाणी पुरवठ्याच्या विहिरीत तरुण मजुराची आत्महत्या

 

– मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील घटना 

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील आत्महत्येचे सत्र सुरु असतांना आज पुन्हा एका शेतमजूराने विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना गुरुवारला दुपारी उघडकीस आली.

प्रितम सुरेश सिडाम (32) असे आत्महत्या केलेल्या शेतमजूर युवकाचे नाव आहे.

प्रीतम याने येथील पाणी पुरवठा विहिरीत रात्री उडी मारली असावी असा कयास व्यक्त होत आहे. आज दुपारी एक इसम विहीरी जवळ गेला असता विहिरीत मृतदेह तरगतांना दिसला.

प्रीतमने नेमकी कशामुळे आत्महत्या केली याचे कारण अस्पस्ट आहे.त्याच्या पश्चात आई वडील, पत्नी व तीन मुले आहेत.परिणामी, तालुक्यात वाढत्या आत्महत्येचा रेशो कायम असून या सत्राने तालुका कमालीचा प्रभावित होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment